
पथ्रोट : आमचे एक दुसऱ्यावर प्रेम असताना मुलीकडची मंडळी तिच्या इच्छेविरोधात तिचे लग्न लावून देत असल्याबाबतची फिर्याद एका मुलाने पोलिस ठाण्यात दिली. त्यावेळी हळद लागलेल्या वधूने सुद्धा पोलिस ठाणे गाठून मी आई-वडिलांनी निवडलेल्या मुलासोबत माझ्या सहमतीने लग्न करीत असल्याबाबतचे बयाण नोंदविले.