Road Accident sakal
विदर्भ
Road Accident : पत्नीच्या रागावण्याने निघाला आणि; मोटारसायकल आणि कारच्या धडकेत युवकाचा मृत्यू
Accident News : मलकापूर पांग्रा येथील शिक्षक वैभव टाले यांचा साखरखेर्डा-लव्हाळा रोडवर भीषण अपघातात मृत्यू झाला. कार आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला.
साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या मोहखेड जवळ मोटारसायकल आणि कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मोटारसायकल स्वार युवक जागीच ठार झाला. हा अपघात साखरखेर्डा ते लव्हाळा रोडवर १३ मे चे रात्री ११:३० वाजता घडला. मृतकाचे नाव वैभव दामोदर टाले, वय २७ वर्ष, रा.मलकापूर पांग्रा असे आहे. सदर युवक शिक्षक होता व त्याला गोरेगाव येथील मावस बहिणीच्या लग्न सोहळ्यासाठी जायचे होते.