Video : क्वारंटाईन सेंटरमध्ये नाच नाच नाचले हे तरुण... मग

youth dancing in qurantine center video got viral
youth dancing in qurantine center video got viral

महागाव (जि. यवतमाळ) : कोविड केंद्रात क्वारंटाईन असलेल्या काही तरूणांनी नियमांची पायमल्ली करून सिनेगीतांवर बेफाम डांस केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर महागाव पोलिस स्टेशनला सायंकाळी तक्रार दाखल केली. त्यानंतर कोविड केंद्रात झिंगाट करणाऱ्या ९ तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महागाव शहरात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. एका सराफा व्यापाऱ्याचा मृत्यू आणि त्याच्या संपर्कातील सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यामुळे शहरातील तब्बल पाच प्रभाग कंटेंटमेंट झोन जाहीर करावे लागले आहेत.

जोखमीच्या संपर्कात आलेल्या ५२ लोकांना शुक्रवारी महागाव येथील कोविड केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र कोविड केंद्राची शिस्त आणि आचारसंहिता पायदळी तुडवून क्वारंटाईन असलेल्यांपैकी काही तरूणांनी मोबाईलवर गाणी वाजवून जोरदार नृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार कोविड केंद्रात रविवारी घडल्याचे बोलले बोलल्या जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना सोशल डिस्टंसिंगला हरताळ फासण्यात येत आहे, मात्र कोरोना संसर्गाची शक्यता असलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील तरुणांनी चक्क कोविड केंद्रात भरती असताना हा आताताईपणा केल्यामुळे संताप व्यक्त केल्या जात आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या काल सोमवारी महागाव येथील कोविड केंद्राला भेट दिली व क्वारंटाईन तरुणांनी केंद्रातच साजरी केलेली पार्टी आणि नाचगाण्याची चौकशी केली. यावेळी भरती असलेल्या एकाने कोविड केन्द्रात दारू मिळते व आपण दारू पिलो आसल्याची जाहिर कबुली दिली. या एकुणच प्रकारामुळे जिल्हाधिकारी प्रचंड संतापले होते. त्यांनी या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार देण्याची सूचना उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना केली होती. याप्रकरणी ९ जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथरोग अधिनियम आणि भादवी १८८,२६९, ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

महागावातील आणखी एक पॉझिटिव्ह

मृत सराफा व्यावसायिकाच्या निकटच्या संपर्कात असलेला आणखी एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यामुळे आता सराफाच्या संपर्कातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ८ झाली आहे. पॉझिटिव्ह आलेली ही व्यक्ती महागाव येथील कोविड केंद्रात भरती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com