esakal | विषप्राशन करणाऱ्या महिलेला रुग्णालयात नेत असताना युवकाचा मृत्यू | Accident
sakal

बोलून बातमी शोधा

देवानंद रामकृष्ण मंगाम

विषप्राशन करणाऱ्या महिलेला रुग्णालयात नेत असताना युवकाचा मृत्यू

sakal_logo
By
बबलू जाधव

आर्णी (जि. यवतमाळ) : विष पिलेल्या महिलेला दुचाकीने रुग्णालयात नेत असताना एसटीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. २९) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दिग्रस-आर्णी उड्डाणपुलाजवळ घडली. देवानंद रामकृष्ण मंगाम (वय २८, रा. आर्णी) असे मृताचे नाव आहे. तर रज्जू शेख महेबुब (वय ५०) व मुलगा अमन शेख महेबूब (वय २०) गंभीर जखमी झाले.

आर्णी येथील घराशेजारी राहणारे पती-पत्नी सकाळी शेतात गेले. तेथे महिला रज्जू शेख महेबूब (वय ५०) यांनी विषारी औषध प्राशन केले. प्रकृती खालावल्याने देवानंद हा त्यांना सुकळीवरून आर्णी येथे दुचाकीवर मुलासह घेऊन जात होता. रस्त्यात समोरील एसटीने ब्रेक लावल्याने मागून भरधाव येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यात देवानंदचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले.

माझी सासू रज्जू शेख महेबूब हिने विषारी औषध घेतल्याची माहिती फोनद्वारे सय्यद सलीम सय्यद हारून (वय २५, रा. शास्ञीनगर, आर्णी) यांना मिळाली. यानंतर आर्णीतून दुचाकीने अमन शेख व मित्र देवानंद मंगाम सुकळी येथे गेले. सुकळी येथून मित्र देवानंद मंगाम व मुलगा अमन शेख महेबुब व रज्जू शेख महेबूब असे तिघेजण दुचाकीने सुकळी येथून आर्णी येथे दवाखाण्यात जात होते.

हेही वाचा: Video : बस पुरात वाहून गेली; चौघे बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

दिग्रस-आर्णी उड्डाणपुलाजवळ एसटीने ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने बसला मागून धडक दिली. यात मित्र देवानंदन हा जागीच ठार तर रज्जू शेख महेबुब व अमन शेख महेबूब हे गंभीर जखमी झाले. फिर्यादी सय्यद सलीम सय्यद हारून यांनी आर्णी पोलिस स्टेशनला घटनेची माहिती दिली. दोन्ही जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार पिंताबर जाधव करीत आहे.

loading image
go to top