
खामगाव : गाय चोरीच्या संशयावरून मागासवर्गीय तरुणाला निवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शहरात घडली. याप्रकरणी तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात रोष निर्माण झाला असून आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी अनेक संघटनांनी मोर्चे काढून निषेध व्यक्त केला.