
अमरावती ः कुटुंबातील सदस्यांसोबत वाद करून धुमाकूळ घालणाऱ्या युवकाला आटोक्यात करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत त्याने झटापट केली. त्यानंतर त्याने पोलिसांच्या सी.आर. व्हॅनच्या काचा फोडल्याने परिसरात काही वेळेसाठी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.
योगेश अरुण रायकर (वय 25, रा.न्यु.कॉलनी) असे पोलिसांनी आटोक्यात आणलेल्या युवकाचे नाव आहे. वनश्री कॉलनी जवळच्या न्यु कॉलनीत शनिवारी (ता. 29) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. योगेशच्या काकाच्या घरासमोर ही घटना घडली. असे पोलिस उपनिरीक्षक राजू लेवटकर यांनी सांगितले.
योगेशने आधी कुटुंबातील सदस्यांशी वाद घालून एका दुचाकीची तोडफोड केली. काहींना मारहाण केली. नातेवाइकांकडून तो नियंत्रणात येत नव्हता. त्यामुळे त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. तेवढ्यात फ्रेजरपुरा ठाण्याची एमएच 27 एए 483 क्रमांकाची सीआरव्हॅन न्यु कॉलनीत पोचली.
पोलिस हेडकॉन्स्टेबल रवी ढोणे यांनी योगेशला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने ढोणे यांचा दोन्ही हाताने गळा आवळला. त्यांच्याशी झटापट केली. हा वाद दोन कर्मचाऱ्यांनी सोडविला. त्यानंतर घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक श्री. लेवटकर यांच्यासह सात पोलिसांचे पथक पोचले. योगेशला ताब्यात घेऊन सीआर व्हॅनमध्ये बसविले.
नातेवाइकांशी चर्चा करीत असताना, त्याने पोलिसांच्या सीआरव्हॅनच्याही काचा फोडल्या. गेटचा काही भाग चेपल्या गेला. योगेशला नियंत्रणात आणून फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
नातेवाइकाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई केली. आज योगेशने अधिक धुमाकूळ घातल्याने, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागला.
- पुंडलिक मेश्राम, पोलिस निरीक्षक फ्रेजरपुरा ठाणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.