तुमसर - काटेबाम्हणी शिवारातील कालव्यात अंघोळ करताना सोमवारी सकाळी युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. आज, मंगळवारी पहाटे मॉर्निंग वॉककरिता जात असलेल्या युवकांना कालव्यात मृतदेह तरंगताना दिसला. याची माहिती लगेच खापा येथील पोलिस पाटील यांना माहिती देण्यात आली. मृताचे नाव सुहेल सैफी (वय २२, रा. बुलंदशहर, दिल्ली) असे आहे.