भामरागड : जि. प. सीईओ चिखल तुडवत पुरग्रस्तांच्या मदतीला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 September 2019

अहेरी (जि. गडचिरोली) : सततच्या पावसाने भामरागड तालुक्‍यात चार वेळा आलेल्या पुरामुळे शंभराहून अधिक गावे बाधित झाली आहेत. प्रशासनाकडून बाधित गावांना मदत पुरविण्याचे काम सुरू आहेत. मात्र काही गावांत अद्याप मदत पोहाचलेली नाही. अशाच मरकणार गावाला मदत पुरविण्यासाठी निघालेल्या प्राशासकीय अधिकाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागला. यावेळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी चक्क डोक्‍यावर सामान घेत चिखलातून वाट काढली.

जिल्हा परिषद प्रशासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या पुढाकाराने दर्गम मरकणार गावाला जीवनावश्‍यक वस्तंची मदत केली. मंगळवारी(ता. 24) जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वत: सामान घेऊन हेमलकसा येथे पोहचले. तेथून त्यांनी काही अंतर गाडीतून प्रवास केला. मात्र पुढे गाड्या जाने शक्‍य नसल्याने सर्व सामान गाडीतून उतरविण्यात आले. यावेळभ डॉ. राठोड यांनी कोणत्याही प्रोटोकॉलची तमा न बाळगता नाल्यापर्यंत स्वत: सामान डोक्‍यावर घेत चिखलातून वाट काढली. नाल्याच्या पलीकडे मरकणार येथील ग्रामस्थ टॅक्‍टर घेऊन आले होते. तिथून त्यांनी सर्व सामान गावात नेले.
जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद आपल्या सर्वांच्या पाठीमागे भक्कमपने उभे आहे. आपल्याला सर्व ती मदत करण्यात येणार असल्याचे डॉ. राठोड यांनी योवेळी ग्रामस्थांना सांगितले. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी फनेंद्र कुत्तीरकर, मुख्य लेखा वित्त अधिकारी विकास सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी शंभरकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बुरले, जिल्हा कृषी अधिकारी कोडाप, शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, भामरागडचे गटविकास अधिकारी महेश डोके तसेच ग्रामसेवक, शिक्षक व कोतवाल उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: z p ceo reached in flood affected area of bhamragarh walking in mud