राजधानी दिल्लीत जंतरमंतर येथे नियोजित मोठ्या आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 'सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस' (CJP) चे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह त्यांचे सहकारी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर ते विमानात असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईचा आणि विमानतळावरील प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जंतरमंतरवरील निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी हे कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले होते, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे समजते. विमानातूनच थेट ताब्यात घेतल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र पडसाद उमटत असून, विरोधी नेत्यांनी या कारवाईचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.