शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील खानापूर परिसरात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान महम्मद अल्ताफ बेग या लहान मुलाने आपल्या कुटुंबाची बिकट परिस्थिती आदित्य ठाकरें समोर मांडली. वडिलांवर असलेल्या मानसिक व आर्थिक तणावामुळे ते अचानक घरातून निघून जातात, त्यामुळे त्यांची काळजी वाटत असल्याचे तसेच शाळेची फी भरता येत नसल्याचे सांगताना चिमुकल्याचा कंठ दाटून आला. खरीप हंगामातील सोयाबीन आणि उडदाचे पीक पूर्णपणे वाया गेले असून आगामी रब्बी हंगामाचीही कोणतीही शाश्वती उरलेली नाही. घरात अन्नधान्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाल्याची व्यथा मुलाच्या वडिलांनी अत्यंत हताशपणे मांडली. या हृदयद्रावक प्रसंगामुळे शेतकरी कुटुंबांचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.