गणपती विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; दीपक वागसकर यांचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा पोलिसांवर आरोप | Ahilyanagar, Bhingar

Ganpati Visarjan lathi charge: लाठीचार्जनंतर तरुणाचा मृत्यू; संतप्त कार्यकर्त्यांचा पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, भिंगार बंदचा इशारा देत विसर्जन रोखलं..

Ahilyanagar Ganpati Visarjan: अहिल्यानगर शहरातील भिंगार उपनगरात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाठीचार्ज झाल्याचा आरोप असून, त्यानंतर दीपक वागसकर या तरुणाचा मृत्यू झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. गुलाल उधळण्यावरून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे आणि भिंगार पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्यावरही कार्यकर्त्यांनी आरोप केले आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची बदली होईपर्यंत भिंगार बंद ठेवण्यासह गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतल्याचं समजतंय. रात्री उशिरापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी भिंगार वेशीजवळ ठिय्या आंदोलन केलं, तर अनेक गणपती मंडळांनी विसर्जनासाठी आणलेल्या मूर्ती रस्त्यावरच ठेवल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला. घटनास्थळावरून आढावा घेतला प्रतिनिधी सुशील थोरात यांनी....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com