Ravindra Chavan यांचं वक्तव्य, लोकं रस्त्यावर उतरली | Latur News | Vilasrao Deshmukh | Sakal News

Latur News: 'स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसण्याच्या वक्तव्याने संताप उसळला; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानाविरोधात बाभळगाव बंद, सकाळपासून बाजारपेठा कडकडीत बंद'

Vilasrao Deshmukh: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. 'लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी शंभर टक्के पुसल्या जातील' असे विधान केल्यानंतर या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आज लातूर तालुक्यातील बाभळगाव येथे बंदची हाक देण्यात आली. बंदला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून सकाळपासून गावातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. गावात शांततेचे वातावरण असले तरी नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com