Balasaheb Thorat : जिल्हा बँक निवडणूक बिनविरोधासाठी विखे-थोरात-कोल्हे एकत्र!

Balasaheb Thorat: सत्तासमीकरणात बदल घडवणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीत तिघांच्या एकजुटीमुळे विरोधकांपुढे नवे आव्हान, बिनविरोध निवडीची शक्यता

Balasaheb Thorat District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये सहकार क्षेत्रातील सर्वपक्षीय प्रमुखांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. राज्यातील सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती, शेती क्षेत्रातील संकटे आणि सहकार क्षेत्रापुढील वाढती आव्हाने विचारात घेता ही निवडणूक बिनविरोध करण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत होत असल्याचे चित्र आहे. या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भाजप नेते डॉ. सुजय विखे पाटील आणि विवेक कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षांचे प्रमुख लोकप्रतिनिधी व सहकार क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. राजकीय मतभेद आणि पक्षीय जोडे बाजूला ठेवून बँकेची निवडणूक बिनविरोध पार पाडण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून, यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला आहे. या घडामोडीमुळे अहिल्यानगरच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com