संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं हादरलेला बीड जिल्हा आता पुन्हा एकदा अशाच एका हत्या प्रकरणाने चर्चेत आलाय. ते प्रकरण म्हणजे महादेव मुंडे हत्या प्रकरण. परळीतल्या तहसीलदार कार्यालयासमोर असणाऱ्या मैदानात अत्यंत निर्घुणणे ही हत्या झाली. या हत्या प्रकरणाला १८ महिने उलटून गेले मात्र या एकाही आरोपीला अजून ताब्यात घेण्यात आलेलं नाही, साधं नावही समोर येऊन दिलं नाही.. त्यामुळे महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी यांनी १६ जुलैला एसपींना भेटल्यानंतर विषप्राशन केलं. या घटनेनं एकच खळबळ उडालेली असताना या प्रकरणात आता एन्ट्री होतेय ती थेट धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांची. म्हणजे आधीच देशमुख प्रकरणाने अडचणीत आलेले धनंजय मुंडेंच्या प्रकरणामुळेही गोत्यात येण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.