बीड तालुक्यातील पिंपरनई गावातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. गावात राहणारे ४४ वर्षीय शेतकरी विक्रम बाबासाहेब दाभाडे यांनी आर्थिक विवंचना आणि सततच्या नापिकीला कंटाळून आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना उघडकीस येताच दाभाडे कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत लिंबाच्या झाडाखालीच केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता. या दुर्दैवी घटनेमुळे पिंपरनई गावावर आणि संपूर्ण बीड तालुक्यात शोककळा पसरली आहे. शेतीतील नुकसान, डोक्यावरील कर्जाचा डोंगर आणि सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.