भिगवणमधील प्रकरण राज्यभरात चांगलंच तापलं आहे. भिगवणमधील मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मसाला टाकून मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या अपहरणाला धार्मिक रंग दिल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. भिगवणमध्ये बंद पाळत हिंदू आक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आता हे प्रकरण तापल्यानंतर तरुणी स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. आपले अपहरण झाले नाही तर आपण मर्जीने त्याच्यासोबत गेल्याचं या तरुणीने मान्य केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.