Chakan MIDC च्या दुरवस्थेला सरकार-प्रशासन जबाबदार? 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत..

Chakan MIDC company Relocation: खड्डेमय रस्ते, वाहतूककोंडी, अपुऱ्या सुविधांमुळे उद्योग संकटात; २० कंपन्या स्थलांतराच्या उंबरठ्यावर, सरकार-प्रशासनावर अनास्थेचे आरोप

Chakan MIDC News: चाकण एमआयडीसीतील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेमुळे उद्योगांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. खड्डेमय रस्ते, वाहतूककोंडी आणि अपुऱ्या सुविधांमुळे उद्योजकांचा खर्च वाढत असून काही कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी चाकण एमआयडीसीच्या दुरवस्थेला सरकार आणि प्रशासनाची अनास्था जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. स्थानिक नेतृत्वाच्या निष्क्रियतेवरही त्यांनी सवाल उपस्थित केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com