पीक विम्याच्या प्रश्नावर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी शेतकरी आपला आक्रोश आणि समस्या मांडत असताना धनंजय मुंडे यांनी ‘हळू बोला, हळू बोला’ असे म्हटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना बोलण्यापासून रोखल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच, ‘आमचा आवाज का उठवला नाही?’ असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेत असून, नेमकं त्यावेळी काय घडलं? शेतकऱ्यांनी काय आरोप केले? आणि धनंजय मुंडे यांनी नेमकं काय म्हटलं? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.