वडिलांचा आजार…डोक्यावर कर्ज! दुष्काळाने संसारच उद्ध्वस्त

वडिलांच्या उपचारासाठी सोडले शिक्षण, दुष्काळामुळे पिके वाया; धाराशिवच्या तरुण शेतकरी रोहित कारभारी यांच्यावर साडेपाच लाखांच्या कर्जाचा डोंगर.

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात तीव्र दुष्काळामुळे शेतीव्यवस्थेचे कंबरडे मोडले असून, बळीराजा दुष्टचक्रात सापडला आहे. लोहारा तालुक्यातील जेवळी येथील तरुण शेतकरी रोहित कारभारी यांच्या कुटुंबाची कहाणी मराठवाड्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाची व्यथा मांडणारी आहे. वडिलांच्या गंभीर आजारपणावरील उपचाराचा खर्च भागवण्यासाठी रोहितने आपले शिक्षण अर्ध्यावर सोडले आणि वयाच्या अवघ्या तरुण वयात शेतीची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. परंतु, सततच्या दुष्काळामुळे व अपुऱ्या पावसामुळे हाताशी आलेली पिके पूर्णपणे वाया गेली. अशातच बँक, बचत गट आणि खाजगी फायनान्स कंपन्यांचे मिळून तब्बल साडेपाच लाख रुपयांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर झाले आहे. शेतातून उत्पन्नाचा एकही पैसा हातात येत नसताना कर्जाचे हप्ते कसे फेडायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या विवंचनेत असलेल्या या तरुण शेतकऱ्याची संघर्षगाथा सांगणारा हा विशेष रिपोर्ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com