राज्य सरकारने धाराशिव जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केल्यानंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा निर्माण झाली आहे. तुळजापूर तालुक्यातील खानापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या भीषण वास्तवतेवर बोलताना प्रशासनाकडे तातडीने मदत देण्याची आक्रमक मागणी केली आहे. सततच्या पावसाच्या तुटीमुळे विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या असून, पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर मांडलेल्या समस्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सर्वात अग्रस्थानी आहे. हिरवा व वाळलेला चारा उपलब्ध नसल्यामुळे दुभती जनावरे कशी जगवायची, असा यक्षप्रश्न पशुपालकांसमोर आहे. यासोबतच पशुधनासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने सरकारने तातडीने चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी विनंती खानापूरच्या शेतकऱ्यांनी केली आहेखरीप पिके हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने तात्काळ दुष्काळी उपाययोजना लागू करून पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या, पीकविमा भरपाई आणि शेती कर्जात सवलती लागू कराव्यात, अशी ठाम भूमिका खानापूरच्या शेतकऱ्यांनी मांडली आहे. कागदोपत्री घोषणांपेक्षा प्रत्यक्ष मदत खात्यावर जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.