गोकुळमध्ये ‘मोठा भाऊ’ कोण? महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच! Gokul Election 2026

गोकुळ निवडणूक २०२६ पार्श्वभूमीवर महायुतीत वर्चस्वाच्या लढाईला उधाण; जागावाटपात कोणाला किती मान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ' दूध संघाची निवडणूक आता केवळ एका सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नसून, ती कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय शक्तिपरीक्षा ठरणार आहे. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपाचा अधिकृत फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नसतानाही, महायुतीने २४ सप्टेंबरपासून एकत्र प्रचाराचे रणशिंग फुंकण्याचा निर्धार केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपाचा अंतिम तिढा ७ ऑक्टोबरला सुटणार आहे. त्यामुळे २५ जागांसाठी दाखल झालेल्या अर्जांमधून नक्की कोणाला संधी मिळणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पॅनेलनेही मोर्चेबांधणी तीव्र केली असून ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Milk Union
Gokul Election
Gokul Election
Gokul Election Power Struggle
Marathi News Esakal
www.esakal.com