समुद्रात दरवर्षी कोट्यवधी टन प्लास्टिकचा कचरा साचत असून त्याचे महासागरांमध्ये प्रचंड मोठे साठे तयार झाले आहेत. यातील सर्वात मोठा साठा म्हणजे 'ग्रेट पॅसिफिक गारबेज पॅच' (Great Pacific Garbage Patch). महासागरातील चक्राकार प्रवाहांमुळे (Ocean Gyres) प्लास्टिक एकाच ठिकाणी जमा होते. सूर्यप्रकाश आणि लाटांमुळे या प्लास्टिकचे बारीक कणांमध्ये रुपांतर होते, ज्याला 'मायक्रोप्लास्टिक्स' (Microplastics) म्हणतात. हे मायक्रोप्लास्टिक्स समुद्री जीव अन्नाची वस्तू समजून खातात, ज्यामुळे जलचर मृत्युमुखी पडत आहेत. इतकेच नाही तर सागरी अन्नसाखळीद्वारे हे सूक्ष्म प्लास्टिक मानवाच्या ताटात पोहोचत असून आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत आहे. हा प्लास्टिकचा कचरा नष्ट करण्यासाठी 'द ओशन क्लीनअप' (The Ocean Cleanup) ही संस्था बोयन स्लॅट यांच्या नेतृत्वाखाली कसे काम करते आणि आपण प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी काय करू शकतो, याचा सविस्तर आढावा या लेखात घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.