Jalgaon District Bank Election: जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी! २१ पैकी १२ जागा बिनविरोध; भाजप की शिंदे सेना वरचढ?

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने २१ पैकी १२ जागांवर बिनविरोध बाजी मारली. भाजप-शिंदे सेनेतील रस्सीखेच आणि घराणेशाहीची चर्चा.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. ही निवडणूक केवळ बँकेच्या संचालकपदापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व आणि महायुतीतील अंतर्गत ताकदीची लढाई बनली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळाली. मात्र, नेत्यांच्या राजकीय वजनामुळे अनेक जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील, मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीच्या अनेक उमेदवारांनी बाजी मारली. जळगाव जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी तब्बल १२ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? भाजप आणि शिंदे सेनेत कोण वरचढ ठरले? तसेच घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा का चर्चेत आला? जाणून घ्या सविस्तर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...