जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीने जागावाटपात महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकही जागा दिली नसल्याचा आरोप होत असून, महायुतीच्या तब्बल 12 जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता उर्वरित 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शेतकरी संघटनेच्या साथीने 'शेतकरी एकता पॅनल' स्थापन केले आहे. या पॅनलच्या माध्यमातून सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, ट्रॅक्टर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून शेतकरीपुत्रांना संधी मिळावी, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वतंत्र भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महायुतीविरोधात काँग्रेसने उभे केलेले आव्हान आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या उर्वरित जागांसाठी होणाऱ्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.