अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात माणुसकीचा हृदयस्पर्शी आदर्श पाहायला मिळाला. 40 वर्षीय देवानंद चव्हाण यांची किडनी निकामी झाल्यानंतर त्यांच्या 55 वर्षीय सासू रंजना सोळंके यांनी स्वतःची एक किडनी दान करण्याचा मोठा निर्णय घेतला. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने 75 वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. ही संपूर्ण शस्त्रक्रिया आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली. प्रत्यारोपणानंतर सासू आणि जावई दोघांचीही प्रकृती उत्तम असून या घटनेचं राज्यभरातून कौतुक होत आहे. नात्यांतील प्रेम, त्याग आणि माणुसकीचं हे प्रेरणादायी उदाहरण अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांच्या कौशल्यामुळे आणखी एका रुग्णाला नवजीवन मिळालं असून आरोग्य व्यवस्थेचंही हे मोठं यश मानलं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.