लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (LDCC Bank) निवडणूक जाहीर होताच मराठवाड्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक दशकांपासून या बँकेवर माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या कुटुंबाचे आणि काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यंदा ही बँक ताब्यात घेण्यासाठी महायुतीने जोरदार रणनीती आखली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील आमदार व नेत्यांची कानउघाडणी करत निवडणूक ताकदीने लढण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. दुसरीकडे, भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यातील मतभेद मिटवून महायुती एकत्र रिंगणात उतरण्याच्या हालचाली वेगात सुरू आहेत. १५ नोव्हेंबरला होणाऱ्या या मतदानात काँग्रेसचा पारंपरिक गड कायम राहणार की महायुती सहकार क्षेत्रातील हे मोठे सत्ताकेंद्र काबीज करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.