लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून मसलगा धरण कोरडंठाक पडलं आहे. धरणात पाणी नसल्याने परिसरातील शेतीसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेरणीसाठी केलेला बियाण्यांचा खर्चही निघणं कठीण झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून शेतीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुष्काळी परिस्थितीचा आढावा सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी घेतला. यावेळी त्यांनी मसलगा धरण परिसरातील पाणीटंचाई, शेतीची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचं हे वास्तव शेतकऱ्यांसमोरील वाढत्या संकटाची जाणीव करून देणारं आहे. धरण कोरडं पडल्याने शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.