मराठवाड्यातील भीषण दुष्काळ, पिकांचे झालेले नुकसान आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील लोंढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या आजारपणावरील उपचारासाठी घेतलेले कर्ज, उपचारादरम्यान मुलाचे झालेले दुर्दैवी निधन आणि त्यानंतर कुटुंब चालवण्यासाठी व कर्जफेडीसाठी सुनेला मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घ्यावे लागलेले उच्च व्याजाचे कर्ज... या सलग घडामोडींमुळे ७५ वर्षांच्या वृद्धा मणकाबाई लोंढे यांच्यासमोर जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घरात कमावता पुरुष उरलेला नाही, हाताला कोणतेही काम नाही आणि डोक्यावर मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या हप्त्यांचा प्रचंड ताण आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबे मायक्रो फायनान्सच्या दुष्टचक्रात कशी होरपळत आहेत, याचे हे विदारक चित्र आहे. ऐका मणकाबाई लोंढे यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.