दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत मिळणार? कृषिमंत्री काय म्हणाले ?

२६५ दुष्काळग्रस्त तालुके, सोयाबीन-कापूस पिकांचे नुकसान अन् मदतीचा प्रश्न; कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिली महत्त्वाची माहिती.

महाराष्ट्रात पावसाच्या लहरीपणामुळे आणि तीव्र दुष्काळामुळे राज्यभरातील तब्बल २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. या भीषण संकटामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदत आणि पीक नुकसान भरपाईबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात सध्या महसूल व कृषी विभागामार्फत युद्धपातळीवर पंचनामे सुरू असून, लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. केंद्राचे पथकही पाहणी करत असून, बळीराज्याला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी भूमिकाकृषी विभागाने घेतली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषीविषयक ताज्या घडामोडी आणि मदतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com