महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बळीराजाला मोठा दिलासा देत अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. आगामी दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा यासाठी राज्यातील पात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५,००० रुपयांची अग्रिम (Advance) आर्थिक मदत दिवाळीपूर्वी थेट (DBT द्वारे) जमा केली जाणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. दुष्काळ निवारणाची संपूर्ण पंचनामा व अंतिम भरपाईची तांत्रिक प्रक्रिया सणापूर्वी पूर्ण होणे कठीण असल्याने, शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा म्हणून ही मदत दिली जात आहे. यासोबतच राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या आता ३०५ पर्यंत वाढली असून, बाधित शेतकऱ्यांच्या बँक कर्जाच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देण्यासह विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.