Manoj Jarange Patil : उपाशीपोटी कोणी राहू नये म्हणून... आंतरवालीत 3 क्विंटल दाळबाटी!

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंतरवाली सराटीत राज्यभरातून मराठा बांधवांची गर्दी; स्थानिक नागरिकांकडून जेवणाची व्यवस्था

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव आंतरवाली सराटी येथे दाखल होत आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी दूरदूरवरून येणाऱ्या मराठा बांधवांना उपाशीपोटी राहावे लागू नये, यासाठी स्थानिक नागरिकांनी जेवणाची विशेष व्यवस्था केली आहे. आंतरवाली सराटी आणि शहापूर येथील मराठा बांधवांच्या पुढाकारातून तब्बल तीन क्विंटल दाळबाटी तयार करण्यात येत आहे. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या आंदोलकांसाठी अन्न-पाण्याची सोय करण्यासाठी स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाढत असलेली गर्दी आणि मराठा बांधवांकडून करण्यात आलेली ही व्यवस्था सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या जेवणाच्या तयारीचा आणि व्यवस्थेचा आढावा प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com