Manoj Jarange Patil: ‘मागण्या मान्य करा, नाहीतर उडी घेऊ’; लातूरमध्ये मराठा तरुणांचा टोकाचा इशारा

लातूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मराठा तरुणांचे आक्रमक आंदोलन; कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र न मिळाल्याने सामाजिक न्याय भवनावर चढून दिला इशारा

लातूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा तरुणांनी आक्रमक आंदोलन केले. कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप करत काही तरुण सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीवर चढले. मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मागण्या मान्य न झाल्यास इमारतीवरून उडी घेण्याचा इशाराही तरुणांनी दिला. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून आंदोलनाला लातूरमध्येही तीव्र स्वरूप आले आहे. प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यातील विविध भागांतून पाठिंबा मिळत असताना लातूरमधील या आंदोलनामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नेमकं काय घडलं? बघा हा व्हिडीओ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com