Navnath Waghmare : ‘जरांगेंनी माफी मागितली तर कानाला धरून माफी मागेन’; वाघमारेंचं मोठं विधान

मराठा महिलांविषयीच्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत वाघमारे यांची स्पष्टीकरणाची नवी भूमिका; जरांगेंनी माफी मागितल्यास कानाला धरून माफी मागण्याची तयारी.

जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाला नवं वळण मिळालं आहे. मराठा समाजातील महिलांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल वाघमारे यांनी खेद व्यक्त केला असून, आपल्याकडून यापूर्वी अशा प्रकारचं वक्तव्य कधीही झालं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘माझ्या राज्यातील भगिनींनी मला समजून घ्यावं आणि मला पदरात घ्यावं,’ असं म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला. तसेच, ‘जरांगेंनी माफी मागितली तर मी कानाला धरून माफी मागेन,’ असंही वाघमारे म्हणाले. यासोबतच छगन भुजबळ, मुंडे बंधू-भगिनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबाबत जरांगे यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवरून त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय म्हणाले? बघा हा व्हिडीओ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com