Nilanga Drought : मसलगा धरण कोरडंठाक! 17 गावांवर घोटभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ | Maharashtra Drought

Nilanga Water Crisis आणि Masalga Dam मधील पाणीसाठा संपल्याने १७ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचं संकट निर्माण झालं आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात पाणीटंचाईचं भीषण संकट निर्माण झालं आहे. तालुक्यातील मसलगा धरण पूर्णपणे कोरडंठाक पडलं असून, धरणात पिण्यासाठीही पाणी शिल्लक नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे परिसरातील तब्बल १७ गावांमधील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यातच पाण्याची अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाणीटंचाईमुळे दैनंदिन गरजांसाठी पाणी मिळवणंही ग्रामस्थांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईचं वास्तव मसलगा धरणाच्या परिस्थितीतून समोर येत आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या पाणी नियोजनावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. नेमकी किती गंभीर आहे निलंगा तालुक्यातील परिस्थिती? पाण्यासाठी ग्रामस्थांना काय करावं लागत आहे? १७ गावांमधील तहानलेल्या नागरिकांचं वास्तव जाणून घेण्यासाठी पाहा साम टीव्हीचा विशेष ग्राऊंड रिपोर्ट 'दुष्काळ देशा', मुख्य संपादक निलेश खरे यांच्यासोबत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...