OBC Morcha Mumbai : जरांगेंनंतर हाकेही मुंबईच्या मैदानात; १ सप्टेंबरला OBC मोर्चाची घोषणा

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या हाकेनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा १ सप्टेंबरला मुंबईत मोर्चा; मराठा-ओबीसी आरक्षण संघर्षाला नवे वळण.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने आंदोलनाचा नारा दिल्यानंतर महाराष्ट्रातील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांच्या भूमिकेनंतर आता ओबीसी नेतेही आक्रमक झाले असून, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबरला मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही आंदोलनाची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लक्ष्मण हाके यांच्या मुंबई मोर्चाच्या घोषणेमुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आता १ सप्टेंबरच्या ओबीसी मोर्चात नेमकी कोणती भूमिका मांडली जाते आणि सरकार या आंदोलनाकडे कसं पाहतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले? बघा हा व्हिडीओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com