नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी छेडलेल्या आंदोलनावर भारतीय जनता पक्षाचे नेते परिणय फुके यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. फुके यांनी राहुल गांधींचे हे आंदोलन पूर्णपणे 'नॉन-इश्यू' (बिनामुद्याचे) असल्याचा दावा केला. मतदार याद्यांच्या पारदर्शकतेसाठी बनावट, डुप्लिकेट, मृत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे ही निवडणूक आयोगाची वैधानिक प्रक्रिया असताना विरोधक यावर उगाचच राजकारण करत असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय, राहुल गांधींच्या या आंदोलनाला आणि आंदोलकांना विदेशी संस्थांचे अर्थसहाय्य (Foreign Funding) मिळत असून यामागे 'अर्बन नक्षलवादी शक्ती' कार्यरत असल्याचा सनसनाटी आरोपही फुके यांनी केला आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे दिल्लीतील निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाला आता मोठे तीव्र राजकीय वळण मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.