आरोपींनी शिव्या, दवाखान्यात नेण्याचं नाटक, पुर्णेकरांच्या हत्येचा कट रचणाऱ्याचा भंडाफोड..

Pradeep Punekar Case: ऑडिओ क्लिपमुळे पूर्णेकर हत्येचा प्लॅन उघड! प्री-प्लॅन मर्डरमागील मुख्य सूत्रधाराचा चेहरा आला समोर, ठाणे पोलिसांकडून फॉरेन्सिक तपास सुरू.

Pradeep Punekar Murder Case: ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या हाती आता एक अत्यंत महत्त्वाचा आणि खळबळजनक पुरावा लागला आहे. ही हत्या आधीपासूनच पूर्ण नियोजित (Pre-planned Murder) असल्याचे उघड झाले होते, परंतु आता समोर आलेल्या एका वादग्रस्त ऑडिओ क्लिपने (Audio Clip) या हत्येचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा बुरखा टरकावला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये हत्येचे नियोजन, आर्थिक व्यवहार आणि हत्येनंतर पसार होण्याच्या रणनीतीबाबत संभाषण असल्याचे समोर आले आहे. या नव्या खुलाशामुळे ठाण्याच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाने या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली असून, त्या आधारे मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com