ठाण्यातील खळबळजनक प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला असून ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तपासाला वेग दिला आहे. हत्येमागील कट आणि सहभागाचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी संशयित राजेंद्र शिंदे आणि आधीच अटकेत असलेला मुख्य आरोपी सुभाष उर्फ पप्या शिंदे या दोघांना समोरासमोर बसवून कसून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, आरोपी पप्या शिंदे याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्यामुळे त्याला पुढील तपासासाठी ठाणे न्यायालयात हजर केले जाणार आहे. हत्येत वापरलेली शस्त्रास्त्रे, आर्थिक रसद पुरवणारे व्यक्ती आणि यामागचे राजकीय कनेक्शन उघड करण्यासाठी गुन्हे शाखा न्यायालयाकडे पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्याची दाट शक्यता आहे. या हाय-प्रोफाईल हत्या प्रकरणातील रोज नवीन खुलासे होत असल्याने संपूर्ण ठाणे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या तपासावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.