पुण्यातील मांजरी येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला आता अधिक तीव्र वळण मिळाले आहे. उपोषणादरम्यान एका आंदोलक विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे आंदोलनस्थळी चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक विद्यार्थी अधिक आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या, उपोषणकर्त्यांची प्रकृती आणि सरकारकडून होणारी संभाव्य कार्यवाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनस्थळी नेमकं काय घडतंय? बघा संपूर्ण व्हिडीओ...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.