27 सप्टेंबरच्या MPSC आंदोलनात Rahul Gandhi? शिवराज मोरेंनी काय सांगितलं? Rahul Gandhi | Shivraj More

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; राहुल गांधींना सहभागी होण्याचे आवाहन, शिवराज मोरेंची माहिती

27 सप्टेंबरला पुण्यात होणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी मोठी माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, अशी विनंती करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राहुल गांधी यांच्या टीमशी संपर्क सुरू असून, गरज पडल्यास ते विद्यार्थ्यांच्या लढ्यात सहभागी होऊ शकतात, असा दावा शिवराज मोरे यांनी केला. MPSC अध्यक्षांचा राजीनामा, 70 हजार पदांची भरती आणि परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com