सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत मोहिते-पाटील कुटुंबातील दिग्गजांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राजकीय समीकरणांना मोठं वळण मिळालं आहे. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दोन मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या भूमिकेचीही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपच्या नेत्यांची मोट बांधत निवडणुकीत आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. उर्वरित आठ जागांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याची तयारीही गोरे यांनी दर्शवली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक आता केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई बनली आहे. मोहिते-पाटील आपला प्रभाव कायम ठेवणार की जयकुमार गोरे नवा राजकीय डाव यशस्वी करणार? बघा हे विश्लेषण...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.