Vaishnavi Hagwane प्रकरणात ६ आरोपींवर दोषारोप निश्चित, २३ तारखेपासून सुनावणी | Sakal News

Pune News: पुण्यातील गाजलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड; सत्र न्यायालयाकडून सहा आरोपींवर आरोप निश्चित, २३ फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू, आत्महत्या की हत्या? दोन कोटींच्या मागणीसह छळ, पुरावे लपवण्याचे गंभीर आरोपामुळे राज्यभर खळबळ

पुण्यातील गाजलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली आहे. सत्र न्यायालयाने सहा आरोपींवर आरोप निश्चित केले असून येत्या २३ फेब्रुवारीपासून खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. १६ मे रोजी भुकूम येथे वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला; मात्र शवविच्छेदन अहवालात नमूद झालेल्या जखमांच्या खुणांमुळे प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. या प्रकरणात पती, सासू-सासरे आणि इतर कुटुंबीयांवर हुंडाबळी, छळ, आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. तक्रारीनुसार दोन कोटी रुपयांच्या हुंड्याची मागणी आणि सतत छळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून आता २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Pune crime news Lohagad Fort death investigation
Ambarnath Dowry Harassment Case
TOXIC LIQUOR CASE: FADNAVIS CRACKS DOWN, MAIN ACCUSED ARRESTED
Pune Businessman Found Dead in Deccan Hotel
Marathi News Esakal
www.esakal.com