Vilas Ghule Case : सुनेत्रा पवारांच्या दौऱ्याआधी बीडमध्ये खळबळ;विलास घुले यांच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

विलास घुले प्रकरणात न्यायासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुषमा घुले यांचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, बीडमध्ये तणावपूर्ण वातावरण

बीडमध्ये विलास घुले खून प्रकरणावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विलास घुले प्रकरणात न्याय मिळावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत सुषमा घुले यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्याआधीच ही घटना घडल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर घुले कुटुंबीयांच्या मागण्या, आंदोलनाची पार्श्वभूमी आणि प्रशासनाची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे. नेमकं काय घडलं? पाहा हा व्हिडीओ....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com