तुम्ही प्रत्येक सेकंदाला फोन चेक करताय का? मोबाईलच्या स्क्रिनची लाईट लागली तरी तुम्ही मोबाईल पाहाताय का...? हे तुम्ही करत असाल तर वेळीच सावध व्हा...कारण, मोबाईल, गॅजेट्सच्या अतिवापरामुळं नोमोफोबियाचा आजार जडू लागला आहे.

भारतामध्ये तंत्रज्ञानाच्या सवयीचा दर गरजेपेक्षा जास्त वाढल्याने तरूणाई 'नोमोफोबिया' नावाच्या आजाराने ग्रस्त होत आहे. त्यामुळं गॅजेट, मोबाईलचा वापर गरजेपुरताच करायला हवा. पण, नक्की काय आहे नोमोफोबिया याबद्दल अधिक माहिती जाणून घेणं गरजेचं आहे.
नोमोफोबिया म्हणजे काय ?
मोबाईल स्क्रीन डोळ्यासमोर नसल्याने अस्वस्थता वाटते
वारंवार मोबाईल पाहण्याची सवय लागते
आपला मोबाईल विसरण्याची भीती असते
मोबाईलच्या अतिवापराचे तोटे ?
फोनच्या वापरामुळे तुमचा वेळ वाया जातो
वागण्या-बोलण्यामध्ये अस्वस्थता येऊ लागते
फोनच्या अतिरेकी वापरामुळे झोप बिघडते, झोप कमी येते
मोबाईल फोनचा बराच वेळ वापर केल्यानंतर मान दुखणं
डोळे कोरडे होणं, कंम्प्यूटर व्हिजन सिंड्रोम आणि अनिद्रेचं कारण बनतात
त्यामुळे मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा. एका दिवसात तीन तासापेक्षा जास्त वेळ कंप्युटरचा वापर करू नका. मोबाईल दिवसातून एकदाच चार्ज करावा. या नियमांचं पालन केल्यास नामोफोबियाचा होणार नाही. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आमच्या पडताळणीत तरूणाईला 'नोमोफोबिया' आजार जडतोय हा दावा सत्य ठरला आहे.