
कश्मीर की कली! पहलगाममध्ये सारा अली खानचा अनोखा अंदाज

Sara Ali Khan Kashmir Trip
सारा अली खान सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर (Sara Ali Khan Kashmir Trip) आहे. तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या सुट्टीची झलक दाखवलीय.

Sara Ali Khan Kashmir Trip
जम्मू-काश्मीरमधील अनेक सुंदर ठिकाणी ती फिरत आहे. पहलगाममधील ट्रेकिंगचे काही फोटो तिनं चाहत्यांसोबत शेअर केलेत.

Sara Ali Khan Kashmir Trip
सारा अली खाननं काश्मीर ट्रिपचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेत. या फोटोंमध्ये ती पहलगाममध्ये ट्रेकिंग आणि कॅम्पिंग करताना दिसत आहे. हे खास फोटो शेअर करत सारानं स्वत:ला 'कश्मीर की कली' असं म्हटलंय.

Sara Ali Khan Kashmir Trip
सारा अली खान कॅम्पिंगचा खूप आनंद घेत आहे. सारानं पहलगाम ट्रेकसाठी आरामदायक पोशाख निवडलाय. फोटोत ती लाल जॅकेट आणि ट्राउझरमध्ये दिसत आहे.

Sara Ali Khan Kashmir Trip
सारानं ट्रेकिंगसाठी हातात एक लांब काठी धरलीय. शिवाय, तिनं काळ्या रंगाचा शूजही घातलाय.

Sara Ali Khan Kashmir Trip
साराला काश्मीर खूप आवडतं. ती अनेकदा सुट्टीसाठी काश्मीरच्या सहलीला जात असते. याआधीही तिनं काश्मीर दौऱ्याचे फोटो शेअर केलेत.

Sara Ali Khan Kashmir Trip
तिच्या शेड्यूलबाबत बोलायचं झालं तर.. सारा अली खान शेवटची अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती विक्रांत मॅसीसोबत 'गॅसलाइट'मध्ये दिसणार आहे.
Web Title: Sara Ali Khan Kashmir Trip Photos As She Shares Pahalgam Trekking Pics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..