अँड्राइडची अकरावी आवृत्ती

ऋषिराज तायडे
Wednesday, 26 February 2020

अँड्राईडच्या दहाव्या आवृत्तीच्या तुलनेत नव्या आवृत्तीत फाईव्ह जी, प्रायव्हसी, डेटा सिक्‍युरिटीसह अनेक नवे फीचर्स देण्यात आले आहेत. जाणून घेऊया त्याबाबत...

गुगलने नुकतीच अँड्राईडची नवी आणि अकरावी आवृत्ती सादर केली. सध्या ती सर्वांसाठी उपलब्ध नसली तरी त्याची प्रीव्ह्यू आवृत्ती गुगलच्याच पिक्‍सल २, ३, ३, ३A आणि ४ वर चाचणीसाठी उपलब्ध झाली आहे. अँड्राईडच्या दहाव्या आवृत्तीच्या तुलनेत नव्या आवृत्तीत फाईव्ह जी, प्रायव्हसी, डेटा सिक्‍युरिटीसह अनेक नवे फीचर्स देण्यात आले आहेत. जाणून घेऊया त्याबाबत...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

बबल्स
फेसबुकच्या चॅट हेड्‌सची आठवण करून देणारे बबल्स हे फीचर मेसेजिंगसाठी सोप्या पद्धतीने करता यावे, यासाठीचे नवे युआय ॲप आहे. हे ॲप व्हॉट्‌सॲप, फेसबुक मेसेंजरसारख्या ॲपलाही सपोर्ट करेल.

कॉर्न्व्हसेेशन  
ॲप अपडेट्‌सह व्हॉट्‌सॲप, मेसेंजर, ई-मेल यांसह अन्य संदेशवहन अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ही सुविधा दिली आहे. जेणेकरून एकाचवेळी अनेकांशी संवाद साधणे सोपे जाईल. 

ॲप परवानगी
 काही ॲपचा वापर करताना कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशनचा वापर केला जातो. त्यासाठी युजरकडून परवानगीही मागितली जाते. अँड्राईडच्या नव्या आवृत्तीत ॲपसाठी परवानगी देताना सुरक्षेची खात्री दिली आहे.  

स्क्रीन रेकॉर्डिंग
अँड्राईडच्या नव्या आवृत्तीत स्क्रीन रेकॉर्डिंगची सुविधा दिली आहे. त्यामध्ये फॅन्सी युआय मॉडेलचा वापर केला आहे.

याशिवाय नव्या आवृत्तीत ऑटोमॅटिक डार्क मोड, व्हिडिओ-ऑडिओ प्ले किंवा पॉज करण्यासाठी मोशन सेन्स गेश्‍चर, उत्तम टच सेन्सिटिव्हिटी, महत्त्वाच्या ॲप्सला प्राधान्य देण्यासाठी ‘पिन्ड ॲप’, ब्लुटूथ कनेक्‍टिव्हिटी न तुटता एरोप्लेन मोड या सुविधा दिल्या आहेत. सध्या डेव्हलपर प्रीव्ह्यू पातळीवर असलेली अँड्राईडची अकरावी आवृत्ती जून महिन्यात औपचारिकरीत्या बाजारात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh Edition of Android