‘क्‍लोज एन्डेड इक्विटी’ योजनांत गुंतवणुकीची संधी

अरविंद परांजपे
मंगळवार, 4 जुलै 2017

प्रश्न : सध्या शेअर बाजार खूपच वर आहे. बॅंकांतील ठेवींवरील व्याजदरपण कमी होत आहेत. अशा वेळी कोठे गुंतवणूक करावी? 
उत्तर : "गुंतवणूक कोठे करावी,' याचे उत्तर तुमचे "ऍसेट ऍलोकेशन' देऊ शकेल. इक्विटी, ठेवी, सोने आणि स्थावर या चार प्रकारांतील गुंतवणुकीचे प्रमाण तुम्ही ठरविले असेल आणि त्यानुसार जर तुम्हाला इक्विटी या प्रकारात गुंतवणूक करायची असेल, तर सध्या तीन क्‍लोज एन्डेड इक्विटी योजना बाजारात आल्या आहेत, त्यांचा विचार करू शकता.

प्रश्न : सध्या शेअर बाजार खूपच वर आहे. बॅंकांतील ठेवींवरील व्याजदरपण कमी होत आहेत. अशा वेळी कोठे गुंतवणूक करावी? 
उत्तर : "गुंतवणूक कोठे करावी,' याचे उत्तर तुमचे "ऍसेट ऍलोकेशन' देऊ शकेल. इक्विटी, ठेवी, सोने आणि स्थावर या चार प्रकारांतील गुंतवणुकीचे प्रमाण तुम्ही ठरविले असेल आणि त्यानुसार जर तुम्हाला इक्विटी या प्रकारात गुंतवणूक करायची असेल, तर सध्या तीन क्‍लोज एन्डेड इक्विटी योजना बाजारात आल्या आहेत, त्यांचा विचार करू शकता.

प्रश्न : सध्या "सेन्सेक्‍स'ने 31 हजार अंशांवरची उच्चांकी पातळी गाठली आहे. अशा वेळी यात गुंतवणूक करणे योग्य आहे का? 
उत्तर : आजपर्यंतची ही सर्वांत वरची पातळी आहे, हे खरे आहे. त्याचे आजचे मूल्यांकन हे भूतकाळातील सरासरीपेक्षा थोडे महाग असले तरीही गुंतवणूक करण्यास ते योग्य आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण, देशाची सर्वसाधारण आर्थिक स्थिती ही गेल्या अनेक वर्षांत नव्हती एवढी मजबूत आहे. महागाई वाढ, व्याजदर, महसुली आणि चालू खात्यावरील तूट हे घटक आटोक्‍यात आहेत. थेट परदेशी गुंतवणूक वाढली आहे. रुपया स्थिर आहे आणि इतर देशांच्या तुलनेत सशक्त आहे, ज्यामुळे महागाईवाढीची भीती कमी आहे. घसरलेल्या कच्च्या तेलाच्या दराचा फायदा सरकारने ग्राहकांना न देता सरकारचा ताळेबंद मजबूत करण्याकडे घेतला आहे. या सर्वांचा एकत्रित परिणामस्वरूप "जीडीपी'ची वाढ पुढील 3 ते 5 वर्षे, दरवर्षी सुमारे 8 टक्के राहील, असा अंदाज आहे.

प्रश्न : या इक्विटी योजना कोणाच्या आहेत? त्यांची काय वैशिष्ट्ये आहेत? 
उत्तर : बिर्ला सनलाइफ रिसर्जंट इंडिया फंड (7 जुलै शेवटचा दिवस), एचडीएफसी इक्विटी अपॉर्च्युनिटी सिरीज-2 (11 जुलै शेवटचा दिवस) आणि आयसीआयसीआय प्रू व्हॅल्यू सीरिज (11 जुलै शेवटचा दिवस) अशा या तीन योजना आहेत. पुढील काही वर्षांमध्ये देशाची अर्थव्यवस्था अधिक गतिमान होईल, अशा मुख्य संकल्पनेवर या योजना आधारित आहेत.

प्रश्न : यातील जोखीम काय आहे? 
उत्तर : इक्विटी योजनेत असलेल्या जोखमीच्या बाबी (उदा. शेअर बाजारातील चढ-उतार) येथेही लागू आहेत. एचडीएफसी इक्विटी अपॉर्च्युनिटी योजनेत 6 टक्के निफ्टी "पुट ऑप्शन' घेतला जाणार आहे. याचा फायदा असा, की जर तीन वर्षांनी सध्या असलेल्या 9600 या "निफ्टी'च्या पातळीपेक्षाही जर निफ्टी खाली गेला तरीही गुंतवणूकदारांचा तोटा तेवढा होणार नाही; मात्र निफ्टी वाढल्यास फायदा होत राहील.

प्रश्न : क्‍लोज एन्डेड योजनांत गुंतवणूक करू नये, असे काही जण म्हणतात. त्यामुळे इक्विटी योजनेतील इतर काही पर्याय आहेत का? 
उत्तर : फक्त ओपन एन्डेड योजना चांगल्या आणि क्‍लोज एन्डेड वर फुली मारा, असे म्हणणे योग्य नाही. प्रत्येकाचे आपले फायदे आणि मर्यादा आहेत; पण ज्यांना फक्त चालू इक्विटी योजनेत करायची असेल, त्यांना (साधारण सहा महिन्यांच्या) "एसटीपी'च्या माध्यमातून खरेदी करता येईल. शेअर बाजार वर आहे, असे म्हणून अशा योजनांपासून दूर राहणे, हे हिताचे नाही. कारण, पुढील काळ हा प्रगतीचा आहे, असेच बहुतेकांचे म्हणणे आहे.
-