अमित शहा, स्मृती इराणी राज्यसभेतून संसदेत 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 जुलै 2017

भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत शहा यांच्याबरोबरच वस्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांचेही नाव पुन्हा गुजरातेतून राज्यसभेसाठी निश्‍चित करण्यात आले आहे. राज्यसभेकडे न फिरकणारे पंतप्रधान मोदी यांना राज्यसभेतील समर्थ पर्याय म्हणून शहा यांना संसदीय राजकारणात आणण्याचा भाजपचा मनोदय आहे.

नवी दिल्ली : गेली तीन वर्षे संसदीय सहभागापासून दूर राहिलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा अखेर राज्यसभेच्या मार्गाने संसदेत प्रवेश करणार आहेत. ते गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा सत्तारूढ पक्षाने आज केली.

भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत शहा यांच्याबरोबरच वस्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांचेही नाव पुन्हा गुजरातेतून राज्यसभेसाठी निश्‍चित करण्यात आले आहे. राज्यसभेकडे न फिरकणारे पंतप्रधान मोदी यांना राज्यसभेतील समर्थ पर्याय म्हणून शहा यांना संसदीय राजकारणात आणण्याचा भाजपचा मनोदय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत शहा व इराणी यांची नावे राज्यसभेसाठी गुजरातमधून पाठविण्याचे निश्‍चित करण्यात आले.

गुजरातमधील तीन जागांसाठी येत्या 8 ऑगस्टला निवडणूक होणार आहे. राज्य विधानसभेत भाजपचे बहुमत असल्याने दोन उमेदवार सहजपणे निवडून येणार हे निश्‍चित आहे. कॉंग्रेसला शंकरसिंह वाघेला गटाचा पाठिंबा गृहीत धरला तर कॉंग्रेसच्या कोट्यातून एक जागा येऊ शकते व त्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचे नाव चर्चेत आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: