नितीशकुमार हे पलटूराम: लालूप्रसाद यादव

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी आज पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर शाब्दिक प्रहार केले. नितीश हे पलटूराम असून, त्यांना आपल्या लायकीचा विसर पडला आहे. नितीश यांना प्रारंभी आपणच मदत केली होती, असे यादव यांनी म्हटले आहे. नितीशकुमार संकटात सापडल्यानंतर राष्ट्रीय जनता दलानेच त्यांना मदतीचा हात दिला होता, नितीश आजारी पडतात तेव्हा ते षड्‌यंत्र रचतात. त्यांच्या मनात पूर्वीपासूनच खोट होती. प्रत्येक वेळी त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचा वापर करून घेतला, अशी घणाघाती टीका यादव यांनी केली.

गरिबांना हा माणूस आपल्या घरापर्यंतदेखील येऊ देत नाही. नितीश खरोखरच लोकनेते आहेत तर ते कुर्मी समाजाच्या संमेलनास का गेले नाहीत, असा सवालही त्यांनी केला. जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन जोमात आले असताना आम्ही नितीश यांना पुढे आणले होते. मी विद्यापीठात असताना 1970-71 मध्ये विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत विजयी झालो होतो. लोकप्रियतेच्या बाबतीत मी नितीश यांना खूप सिनिअर आहे, असेही त्यांनी नमूद केले.

तेजस्वीला घाबरले
मुलायमसिंह यांच्या सांगण्यावरूनच मी नितीश यांच्याशी हातमिळवणी केली होती, द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मी विषदेखील प्राशन करायला तयार होतो. नितीश यांचे राजकीय चारित्र्य माहिती असतानादेखील मी त्यांच्याशी हातमिळवणी केली होती. मी म्हातारा झालो आहे, आता या मुलांना संधी द्या, अशी विनंती मी त्यांच्याकडे केली होती. तेजस्वीने चांगले काम केले होते, त्याच्या लोकप्रियतेमुळे नितीशकुमार घाबरले होते, असेही ते म्हणाले.

इतिहासाला उजाळा
नितीशकुमार तुम्ही कोण होता, याचा तुम्हाला विसर पडला आहे. आम्ही जेव्हा छपरातून तीन लाखांपेक्षाही अधिक मतांनी जिंकलो, तेव्हा तुम्ही केवळ विद्यार्थी नेते होता. नितीश दोन वेळेस विधानसभा, तर एक वेळेस लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. हेच नितीश निवडणूक हरल्यानंतर हात जोडत माझ्याकडे आले होते, या इतिहासालाही लालूप्रसाद यांनी उजाळा दिला.