पोलिसानेच हिसकावले भिक्षेकऱ्याचे पैसे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

जम्मू: एका भिक्षेकऱ्याचे पैसे हिसाकवून घेणारा एक पोलिस एका व्हिडिओ चित्रफितीत कैद झाला असून, जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रामबान जिल्ह्यात घडलेली ही धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधीक्षक मोहनलाल म्हणाले, ""या हेड कॉन्स्टेबलचे नाव मुन्वर हुसेन आहे. त्याच्या मद्यपानाच्या आणि इतर वाईट सवयींमुळे त्याची किश्‍तवाड येथून नुकतीच रामबान जिल्ह्यात बदली झाली होती. तो पोलिस वसाहतीतून बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या कडेला बसलेल्या भिकाऱ्याचे हैसे हिसकावून घेत असल्याचे तेथे नियुक्तीवर असलेल्या दुसऱ्या पोलिसाला आढळले. हुसेन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यावर किश्‍तवाड पोलिस ठाण्यात आणखी तीन गुन्हे दाखल आहेत.''

हुसेनच्या वाईट सवयीमुळे त्याच्याकडील एटीएम कार्ड आणि इतर महत्त्वाच्या वस्तू पोलिसांनी त्याच्या पत्नीच्या सुपूर्द केल्या आहेत.